दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीला अखेरची घरघर

By Admin | Updated: August 10, 2014 22:29 IST2014-08-10T22:29:25+5:302014-08-10T22:29:25+5:30

दुय्यम निबंधक कार्यालय अज्ञात व्यक्तिंच्या नासधुसीने हैराण झाले आहे.

The last house to the secondary registrar office building | दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीला अखेरची घरघर

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीला अखेरची घरघर

रिसोड: खरेदी-विक्रीचे व्यवहार सक्षमपणे पेलणारे येथील दुय्यम निबंधक कार्यालय अज्ञात व्यक्तिंच्या नासधुसीने हैराण झाले आहे. गत काही महिन्यांपूर्वी रेकॉर्ड रुमच्या काचा फोडल्या असून, आवारभिंतही अनेक ठिकाणी पाडली आहे. या परिसरातच जनावरे बांधली जात असल्याने दुय्यम निबंधक कार्यालय आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण होतो.
खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी करून त्या नोंदीचे जतन करण्याची जबाबदारी दुय्यम निबंधक कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशिवाय अन्य जबाबदार्‍याही या कार्यालयावर सोपविल्या आहेत. रिसोड येथे दुय्यम निबंधक कार्यालय सिव्हिल लाईनच्या मुख्य मार्गालगत मटन मार्केटला लागून आहे. स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. इंग्रजकालिन बांधकाम असल्याने इमारत जुनी झाली आहे. मुख्य इमारतीच्या बाजूला रेकॉर्ड रुम आहे. या कार्यालयाला चारही बाजूने आवारभिंतीचे कुंपन आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत तसेच आवारभिंतही काही ठिकाणी पाडली आहे. कार्यालय परिसरात एका कोपर्‍यात केरकचरा टाकण्यात येतो. दुसर्‍या कोपर्‍यात जनावरे बांधण्यात येतात. त्यामुळे कोंडवाड्याचे स्वरुप या परिसराला येत आहे. बाजूलाच मटन मार्केट असल्याने घाणपाणीही कार्यालयाच्या परिसरात फेकल्या जाते. एकंदरित विविध समस्यांनी या कार्यालयाला ग्रासले आहे. अज्ञात इसमांकडून रात्रीच्या सुमारास नासधुस होत असल्याने संबंधित कर्मचारीही हतबल ठरत आहेत. पोलिस विभागाने रात्रीच्या गस्तीच्या वेळी या कार्यालयाकडे लक्ष दिल्यास नासधुस करणारी टोळी जेरबंद होऊ शकते. रेकॉर्ड रुमच्या खिडक्या सुरक्षित असणे गरजेचे बनले आहे.

Web Title: The last house to the secondary registrar office building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.