जमीन देणारेच सिंचनाच्या लाभ क्षेत्रातून वगळले
By Admin | Updated: September 3, 2014 00:50 IST2014-09-03T00:50:34+5:302014-09-03T00:50:45+5:30
वारा लघु सिंचन प्रकल्पग्रस्ताना सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वगळले.

जमीन देणारेच सिंचनाच्या लाभ क्षेत्रातून वगळले
देपुळ : वारा (ज.) बृहत लघु पाटबंधारे विभाग सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीपैकी ५0 टक्के जमीन देणार्या प्रकल्पग्रस्त उमरा (शम) देगाव व बोरी (बु.) येथील शेतकर्यांना या सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वगळण्याचा उपक्रम लघुपाटबंधारे विभाग क्रं. ३ च्या अधिकारी कर्मचारी यांनी केला.
हा प्रकल्पग्रस्त शेतकर्यावर अन्याय आहे. जमीन देणार्या शेतकर्यांचा पाणी वापरण्याचा हक्क हिरावून घेणार्या लपाविक्रं. ३ ला धडा शिकवून शेतकर्यांना त्यांचा हक्क मिळवून देवू त्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असा पवित्रा शिवसेनेच्या वारा (ज) सर्कलच्या पं.स. सदस्या सुनिल दादाराव धनगर यांनी घेतला आहे.
वारा जहागीर बृहत लपावि सिंचन प्रकल्पासाठी ६५0 हेक्टर जमीन संपादन करण्यात आली. यावर १00 कोटी पेक्षा जास्त खर्च होत आहे. यापासून १ हजार ७९0 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. हे सिंचन काही कॅनॉल काही लिफ्टद्वारे होणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी लागणार्या ६५0 हेक्टर जमिनीपैकी ५0 टक्के जमीन उमरा (शम) व बोरी (शिवारातील) संपादन करण्यात आली. मात्र या गावांना लाभ क्षेत्रापासून दुर ठेवण्याचा अन्यायी उपक्रम लपावि क्रं. ३ ने केला आहे. यामध्ये त्यांनी वारा (जहाँगीर) ४९७ हेक्टर देपुळला ६२४ हेक्टर काजळांबाला २७९ हेक्टर लहीला १0२ हेक्टर कुंभीला ५५ हेक्टर वसंतवाडीला ४५ हेक्टर आणि चुकांबाला १८८ हेक्टर असे एकूण १ हजार ७९0 हेक्टर सिंचन क्षेत्र लाभक्षेत्र म्हणून वाटून दिले आहे. तर प्रकल्पामध्ये ५0 टक्के जमीन केलेल्या उमरा (शम) बोरी देगावला शून्य हेक्टर लाभ क्षेत्र दिले आहे. हा घणाघाती अन्याय आहे. उमरा (शम) देगाव, एकांबा, बोरी गावाला लाभ क्षेत्रात समाविष्ठ करावे, अशी मागणी गतवर्षी माजी राकाँ जिल्हाध्यक्ष नथ्थुजी कापसे तथा संजय मापारी यांनी केली होती. परंतु लपाविक्र ३ ने या मागणीला केराची टोपली दाखविली.
यावर तात्काळ या गावांना लाभ क्षेत्रात समाविष्ट न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पं.स. सदस्या सुनिता धनगर यांनी संबधितांकडे निवेदनाव्दारे दिला आहे.