घरकुलांसाठी १ रुपया चौरस मीटर दराने मिळणार जमीन!
By Admin | Updated: September 20, 2016 01:06 IST2016-09-20T01:06:13+5:302016-09-20T01:06:13+5:30
वाशिम जिल्हाधिका-यांचे निर्देश; अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना होईल लाभ.

घरकुलांसाठी १ रुपया चौरस मीटर दराने मिळणार जमीन!
वाशिम, दि. १९: 'प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे-२0२२' या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थींसाठी मंजूर गृहनिर्माण प्रकल्पाची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांना १ रुपया चौरस मीटर दराने शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शासनाने सोमवारी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
'सर्वांसाठी घरे', या अभिनव योजनेत समाविष्ट ५१ शहरांमध्ये वाशिमचाही समावेश करण्यात आला असून योजनेची प्रभावीरीत्या अंमलबजावणी सुरू झाली आहे. जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांना शासकीय जमिनी सवलतीच्या दरात मिळणे, विकास शुल्क, मुद्रांक शुल्क आणि मोजणी शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार, जिल्हास्तरावर १ रुपया चौरस मीटर या नाममात्र दराने घरकुलांसाठी जमीन दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी दिली.