१00 गावांतील शेतक-यांमध्ये भूमिसुधार जनजागृती
By Admin | Updated: May 15, 2015 23:09 IST2015-05-15T23:09:07+5:302015-05-15T23:09:07+5:30
सुर्योदय भूमिसुधार अभियान; २३ गावांमध्ये जनजागृती पूर्ण.

१00 गावांतील शेतक-यांमध्ये भूमिसुधार जनजागृती
वाशिम : राष्ट्रसंत भय्युजी महाराजांच्या प्रेरणेने श्री सद्गगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि सुर्योदय परिवार वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने वाशीम, मालेगांव आणि रिसोड तालुक्यातील १00 गावांमध्ये सुर्योदय भूमिसुधार अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांमध्ये जनजागृ ती करण्यात येत आहे. २ मे २0१५ पासून सुरु झालेल्या या अभियानामध्ये आतापर्यत रिठद, येवती, आसेगांव पेन, वनोजा, हिवरापेन, किनखेडा, कवठा, चिखली, तिवळी, वसारी, चिवरा, जांभरुण, सोनखास, लोणी, चाकोली, भर जहांगीर, सवड, तांदळी, कोयाळी, लिंगा, देगावं, वाडी रायताळ, मोहजा या गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. शेतकर्यांनी आपली पारंपारीक शेती करुन जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी रासायनिक खत आणि विषारी औषधांच्या फवारण्या न करता सेंद्रीय खत आणि जैविक तंत्नज्ञानाचा वापर करुन जमिनीतील पिकांसाठी पोषक असणार्या जिवाणूंची संख्या वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षसंवर्धन, पशुपालन, गांडुळखत, हिवरळीचे खत, पालापाचोळ्या पासुन खत तयार करुन जमिनीची पत सुधारणे, व्यसनमुक्ती, आदर्श गावाची निमिर्ती करण्यासाठी विविध विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनकल्याणासाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती गावकर्यांना देण्यात येत आहे. या अभियानामध्ये कृषितज्ञ वल्लभ पाठक, राजेंद्र महाराज शास्त्नी, संतोष नायक, भाऊराव पाटील, प्रशांत देशमुख, सुगदेव सुरदुसे , सुर्योदय परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.