आकर्षक नोंदणी क्रमांकातून लाखो रुपयांची उलाढाल

By Admin | Updated: May 18, 2015 01:41 IST2015-05-18T01:41:13+5:302015-05-18T01:41:13+5:30

पाच वर्षातील स्थिती; वाशिम जिल्ह्यातील १६६१ ग्राहकांची पसंती.

Lakhs of turnover from attractive registration number | आकर्षक नोंदणी क्रमांकातून लाखो रुपयांची उलाढाल

आकर्षक नोंदणी क्रमांकातून लाखो रुपयांची उलाढाल

संतोष वानखडे / वाशिम : वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकापोटी वाशिम जिल्हय़ात एकूण १६६१ ग्राहकांनी गत पाच वर्षात ९0 लाख ७६ हजारांचा महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण ठरते, हे जिल्हय़ातील १६६१ वाहनधारकांनी सिद्ध करून दाखविले आहे. स्वत:ची मनपसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्यपैसाह्ण मोजण्याची तयारी असणार्‍यांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ह्यआवड व निवडीह्णने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे. पसंतीच्या वाहनांची खरेदी केल्यानंतर या वाहनाला पसंतीचाच क्रमांक मिळविण्यासाठी अनेक जण आपल्यापरीने धडपड करतात. ग्राहकांची ह्यपसंती आणि आकड्यांचा लाभदायक खेळह्ण पूर्ण करण्याची धडपड पाहून परिवहन विभागाने महसूल वाढीची योजना जन्मास घातली. यानुसार व्हिआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे ह्यक्रमांकह्ण आरक्षित करून त्याला ह्यकिंमतह्ण देण्यात आली. एक हा क्रमांक सर्वात महागडा असून, तो प्राप्त करण्यासाठी वाहनाच्या मालकांना लाखो रुपये मोजावे लागतात. ग्राहकांची आवड-निवड ह्यकॅशह्ण करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने १, ११, १११, २२२, ३३३, ४४४, ५५५, ६६६, ७७७, ८८८, ९९९ आदी विशिष्ट क्रमांक वाहनांना देण्यासाठी विक्रीकरिता खुले केले आहेत. गत पाच वर्षांपासून एकाही वाहनधारकाने वाशिम उपप्रादेशिक कार्यालयातून एक हा महागडा क्रमांक खरेदी केलेला नाही. इतर क्रमांक मात्र ग्राहकांनी खरेदी केलेले आहेत.

Web Title: Lakhs of turnover from attractive registration number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.