महिलेचे ईल फोटो ‘व्हाट्स अँप’वर टाकले

By Admin | Updated: June 1, 2015 02:13 IST2015-06-01T02:13:14+5:302015-06-01T02:13:14+5:30

वाशिम तालुक्यातील चिखली सुर्वे येथील प्रकार.

The lady's photo was shot on 'What's Amount' | महिलेचे ईल फोटो ‘व्हाट्स अँप’वर टाकले

महिलेचे ईल फोटो ‘व्हाट्स अँप’वर टाकले

वाशिम : गावातील एका विधवेला लग्नाचे आमिष दाखविण्यासोबतच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून पीडित महिलेचे ईल फोटो युवकाने व्हाट्स अँपवर टाकले. या युवकाविरुद्ध पीडित महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३१ मे रोजी गुन्हा दाखल केला. वाशिम तालुक्यातील चिखली सुर्वे येथील गणेश डिगांबर सुर्वे या युवकाने गावातीलच एका विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत संबंध ठेवले. याशिवाय त्याने पीडित महिलेला तिच्या मुलीचेही लग्न लावून देण्याच्या भूलथापा दिल्या. या आमिषाला भाळून व गणेश सुर्वे याच्यावर विश्‍वास ठेवून पीडित महिलेने त्याच्यासोबत बरेच दिवसांपासून संबंध ठेवले. दरम्यान, गणेश पीडित महिलेला २0 मे रोजी मालेगाव येथील लक्ष्मी लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी गणेशने महिलेचे ईल फोटो काढले. हे फोटो गणेशने इतरांच्या मोबाइलवर पाठविल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली. गावामध्ये आपली बदनामी होत असल्याने पीडित महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेवर वाशिम येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. पीडित महिलेने वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश सुर्वे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (क), अट्रॉसिटी अँक्ट, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: The lady's photo was shot on 'What's Amount'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.