वनोजा फाटा येथे गतिरोधकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:41+5:302021-04-06T04:40:41+5:30
गत काही महिन्यांपूर्वी अकोला-आर्णी महामार्गाचे अद्ययावतीकरण अंतीम टप्प्यात आले आहे. आता या महामार्गावर वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे वनोजा ...

वनोजा फाटा येथे गतिरोधकाचा अभाव
गत काही महिन्यांपूर्वी अकोला-आर्णी महामार्गाचे अद्ययावतीकरण अंतीम टप्प्यात आले आहे. आता या महामार्गावर वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे वनोजा फाट्यानजीक अनेक किरकोळ अपघात घडून अनेक जण जखमीही झाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. तथापि, येथे वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. गत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रवासी उभे असताना मंगरुळपीरकडून सुसाट वेगात येणाऱ्या कारने अगदी प्रवाशांना खेटून ही कार नेली. त्यामुळे तेथे लहान मुलासह उभ असलेली महिला गंभीर जखमी झाली. सुदैवाने यातही जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर आणि लगतच भोलेनाथ महाराज यांचा वृद्धाश्रम, तर जवळच श्री क्षेत्र महादेव मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्याचबरोबर शिक्षणासाठी विविध ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. एखादवेळी प्रवासी रस्ता ओलांडत असताना सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे तातडीने गतीरोधक तयार करण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.