नव्या महामार्गावर गतिरोधकांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:18+5:302021-05-30T04:31:18+5:30
कोरोना लसीचे डोस संपले वाशिम : मालेगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस संपले असून, यामुळे लसीकरण मोहीम प्रभावित होत ...

नव्या महामार्गावर गतिरोधकांचा अभाव
कोरोना लसीचे डोस संपले
वाशिम : मालेगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस संपले असून, यामुळे लसीकरण मोहीम प्रभावित होत आहे. एक-दोन दिवसांत लसीचे डोस मिळतील, असे सांगण्यात येत आहे.
आरटीओ जुनी इमारत विनावापर पडून
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नव्या इमारतीत स्थानांतरित झाले. तेव्हापासून जुनी इमारत विनावापर तशीच पडून असल्याने याचा गैरवापर होत आहे.
मोबदला देण्याची धरणग्रस्तांची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील धरणांकरिता जमीन संपादित केलेले शेतकरी अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ मोबदला देण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
धनज परिसरात आरोग्य तपासणी
वाशिम : कोरोना संसर्ग पाहता आरोग्य विभागाकडून दक्षतेच्या दृष्टिकोनातून धनज परिसरात आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे.