निधीची कमतरता; शिक्षकांचे वेतन लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:12+5:302021-05-12T04:42:12+5:30
शिक्षकांच्या वेतनसाठी लागणारा निधी उपलब्ध नसल्यामुळे शिक्षकांचे पगार सध्या होणे कठीण आहे. शासनाकडून अद्यापि निधीसंदर्भात तरतुदीचे पत्र पाप्त झाले ...

निधीची कमतरता; शिक्षकांचे वेतन लांबणीवर
शिक्षकांच्या वेतनसाठी लागणारा निधी उपलब्ध नसल्यामुळे शिक्षकांचे पगार सध्या होणे कठीण आहे. शासनाकडून अद्यापि निधीसंदर्भात तरतुदीचे पत्र पाप्त झाले नाही. त्यामुळे शिक्षकांचे वेतन उशिरा होणार, अशी माहिती प्राप्त झाली. वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक झापे, तसेच अधिकारी प्रमोद मराठे व इंगोले यांनी देयकाचे लॉट पाडून तयार केलेले आहे. निधीचे पत्र प्राप्त होतास तीन दिवसांमध्ये शिक्षकांचे वेतन करण्यास शिक्षण विभाग सज्ज आहे. निधी नसल्यामुळे दर महिन्याला वेतन उशिरा होत आहे, तसेच काही अंशतः अनुदानित शाळांचे मार्चचे वेतन बाकी आहे. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला हप्ता बाकी आहे. निधीची तरतूद नसल्यामुळे असा प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे.