वाशिम जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव
By Admin | Updated: August 21, 2014 00:31 IST2014-08-19T23:39:30+5:302014-08-21T00:31:21+5:30
विविध सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

वाशिम जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव
वाशिम: जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, विविध सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. संबधितांनी याक डे लक्ष देऊन त्वरीत साफसफाई करावी आणि रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी त्वरीत पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
वाशिमला जिल्हय़ाचा दर्जा प्राप्त झाला खरा; परंतु विकासाच्या बाबतीत अतिशय मागे राहिल्यामुळे राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून वाशिमचे नाव घेतले जाऊ लागले. जिल्हय़ात आवश्यक असलेली काही मुख्यालये येथे तयार करण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचाही समावेश आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक अनेक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
काही दिवस येथे बर्यापैकी कारभार चालला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात अव्यवस्थेने क ळस गाठला आहे. मुबलक प्रमाणात औषधी पुरवठा, वैद्यकीय, अधिकारी, कर्मचार्यांची परेशी संख्या असतानाही रुग्णांवर काळजीने उपचार केले जात नाहीत. येथे येणार्या रुग्णांवर थातूरमातूर उपचार करून त्याला लगेचच अकोला येथे हलविण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे 'रेफर टू अकोला' या नावानेच जिल्हा रूग्णालय ओळखले जाऊ लागले. या रुग्णालयाच्या आवारासह आतमध्येही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रसाधनगृहांची अनेक दिवसांपासून साफ सफाई झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे.
परिसरात सर्वत्र गाजर गवत वाढल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, या डासांमुळे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांनाही आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चांगल्या प्रकारचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रेमळ स्वभावानेच रुग्णांचा अर्धा आजार बरा करतात; परंतु वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात नाही. या रुग्णालयातील अव्यवस्थेवि
षयी अनेक वेळा चर्चा झाली; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. संबंधित अधिकार्यांनी या प्रकाराची दखल घेऊन रुग्णालयात साफसफाई अभियान राबवावे आणि रूग्णांची होत असलेली हेळसांड थांबविण्यात यावी, अशी मागणी बंजारा क्र ांती दल महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ही मागणी त्वरीत पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर बंजारा क्र ांती दल महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, देवराज राठोड, प्रा. अनिल चव्हाण, तालुकाध्यक्ष किशोर राठोड, उपतालुकाध्यक्ष लोकेश चव्हाण, शांताराम पवार, गोपीचंद चव्हाण, संजिव जाधव, जीवन राठोड, विनोद राठोड, अशोक चव्हाण, मोहन महाराज आदिंची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविण्यात आली आहे.