मानोरा बसस्थानकावर सुविधांचा अभाव

By Admin | Updated: October 23, 2014 01:03 IST2014-10-23T00:51:47+5:302014-10-23T01:03:19+5:30

मूत्रीघरांची दुरवस्था : पथदिव्यांचा अभाव.

Lack of facilities in Manola Bus Stand | मानोरा बसस्थानकावर सुविधांचा अभाव

मानोरा बसस्थानकावर सुविधांचा अभाव

मानोरा (वाशिम) : एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे येथील बसस्थानकावर प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मानोरा बसस्थानक विविध समस्यांच्या विळख्या अडकले असून, येथे घाणीचे साम्राज्यही पसरले आहे. या बसस्थानकावर दोन मुत्रीघर आहेत. या मूत्रीघरांची दुर्दशा झाली आहे. या बसस्थानकावर आजुबाजूला कचरा विखूरल्या गेला असून हे बसस्थानक की ह्यकचरा स्थानकह्ण असे शब्द प्रवाशांच्या तोंडून ऐकायला मिळते. या ठिकाणची पाण्याची टाकी स्वच्छ होत नसल्याने हेच पाणी प्रवाशांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. नळ सुध्दा लिकीज असल्याने याद्वारे येणार्‍या पाण्याचा अपव्यय होत आहे. सायंकाळच्या वेळी पुरेपूर व्यवस्था नसल्याने प्रवाशी बसस्थानकावर न थांबता कोठेतरी आश्रय घेऊन एस.टी. ची प्रतिक्षा करतात. या बसस्थानकावरून टाईमिंगचे बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची मात्र रोजच गळचेपी होत असल्याने संबंधित अधिकार्‍याने वरील बाबीकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Lack of facilities in Manola Bus Stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.