मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:15+5:302021-09-11T04:42:15+5:30
----- वन्यप्राण्यांकडून भाजीपाला पिकाचे नुकसान वाशिम : यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. अतिउष्णता आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे ...

मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव
-----
वन्यप्राण्यांकडून भाजीपाला पिकाचे नुकसान
वाशिम : यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. अतिउष्णता आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हे पीक संकटात सापडले होते. आता हे पीक बहरत असताना वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
--------------
वाकलेले वीजखांब केले सरळ
वाशिम : ग्रामीण भागांत आठवडाभरापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही वीजखांब उन्मळून पडले, तर काही वाकले होते. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने हे वीजखांब सरळ केले आहेत.
------------------
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात पीककर्जासह इतर आर्थिक व्यवहारांसाठी शेतकरी बँकेत धाव घेत आहेत.
-------
पाईपलाईन नादुरुस्त
वाशिम :जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन लिकेज होऊन पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शुक्रवारीही ही समस्या जाणवली. ही पाईपलाईन दुरूस्त करावी, अशी मागणी होत आहे.
--------------