अनसिंगच्या सेंट्रल बँकेत सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST2021-08-22T04:43:59+5:302021-08-22T04:43:59+5:30
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेत ग्राहकांसाठी शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, एटीएम मशीन आहे, परंतु त्यात ...

अनसिंगच्या सेंट्रल बँकेत सुविधांचा अभाव
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेत ग्राहकांसाठी शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, एटीएम मशीन आहे, परंतु त्यात रक्कमच टाकली जात नसून, एटीएम मशीनजवळ व बँकेत सुरक्षा रक्षकही नाही. खाते पुस्तकात किती रक्कम जमा आहे हे बघण्यासाठी येथे ठेवलेले प्रिंटरही अनेकदा बंद अवस्थेत आढळून येते. या शाखेंतर्गत शेकडो शेतकरी व निराधार योजनांच्या लाभार्थींची केवायसी प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना वारंवार आपली कामे सोडून बँकेच्या शाखेत चकरा माराव्या लागत आहेत, तसेच इतरही अनेक समस्या या बँकेत असून, खातेदारांनी वारंवार मागणी करूनही शाखा व्यवस्थापन त्याची दखल घेत नाही. ‘लोकमत’ने यापूर्वीही वृत्त प्रकाशित करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेतील असुविधांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधले होते.