रस्ता कामावर दिशादर्शक फलकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:28+5:302021-07-10T04:28:28+5:30

------------ पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाशिम: शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले; मात्र, या पिकावरही ...

Lack of directional signs on road works | रस्ता कामावर दिशादर्शक फलकाचा अभाव

रस्ता कामावर दिशादर्शक फलकाचा अभाव

------------

पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

वाशिम: शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले; मात्र, या पिकावरही सद्य:स्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

----------

जोडरस्त्यावर फलकांचा अभाव

कारपा: मानोरा तालुक्यातील कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर माहिती फलक किंवा दिशादर्शक लावलेले नाही. त्यामुळे या मार्गाने मानोरा किंवा शेंदुरजना आढावकडे जाणाऱ्या नव्या चालकांत संभ्रम निर्माण होत आहे.

----------------

वीज पुरवठ्यात व्यत्यय; कामकाज प्रभावित

वाशिम: गत काही दिवसांपासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. शनिवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. ग्रामपंचायत कार्यालय, बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.

----------

‘रोहयो’च्या कामाची देयके प्रलंबित

मोहरी : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकाम दुरूस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कुशल कामांचा निधी मिळालेला नाही.

-------------

पोहरादेवी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन

पोहरादेवी : महानगरातून परतलेल्या एका कुटुंबातील ८ वर्षीय बालकास कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य विभागाने पोहरादेवी, वसंतनगर येथील ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे. या अंतर्गत शनिवारी पोहरादेवीत तपासणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.

----------

वन्यप्राण्यांची शिकार

वाशिम : तालुक्यातील दगड उमरा परिसरात परगावातील शिकारी सशांची शिकार करत आहेत. गतवर्षी या प्रकाराकडे लक्ष वेधल्यानंतर वनविभागाने दोन दिवस येथे फेऱ्या मारल्या; परंतु त्यानंतर याकडे त्यांचे दुर्लक्ष कायम आहे.

Web Title: Lack of directional signs on road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.