कनेक्टिव्हिटीचा अभाव; कामकाजात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:37+5:302021-04-25T04:40:37+5:30

00 पंचायत समितीत अधिकाऱ्यांची पदे रिक्त वाशिम : मालेगाव येथील पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांसह शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, पंचायत, आदी ...

Lack of connectivity; Disruption of work | कनेक्टिव्हिटीचा अभाव; कामकाजात व्यत्यय

कनेक्टिव्हिटीचा अभाव; कामकाजात व्यत्यय

00

पंचायत समितीत अधिकाऱ्यांची पदे रिक्त

वाशिम : मालेगाव येथील पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांसह शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, पंचायत, आदी विभागात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. कायमस्वरुपी गटविकास अधिकारी यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने गुरुवारी करण्यात आली.

००

लक्षणे असल्यास चाचणी करावी

वाशिम : सर्दी, ताप व खोकला, घसा, आदी लक्षणे असणाऱ्या, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी वेळ न दडविता तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शनिवारी केले.

००००

आणखी दोन कोविड हॉस्पिटल

वाशिम : कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार मिळावे याकरिता आणखी दोन खासगी कोविड हॉस्पिटलला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २४ एप्रिलला मंजुरी दिली आहे.

०००

मालेगाव येथे कोरोना चाचणी

वाशिम : मालेगाव शहरातील गर्दीच्या ठिकाणी व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी केली जाणार आहे.

Web Title: Lack of connectivity; Disruption of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.