कोंडवाड्याची दुरवस्था
By Admin | Updated: July 12, 2014 23:19 IST2014-07-12T23:19:57+5:302014-07-12T23:19:57+5:30
कोंडवाड्याची दयनिय अवस्था झाली असून शेतकर्यांना मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे.

कोंडवाड्याची दुरवस्था
उंबर्डाबाजार: येथे सन १९६५ साली कोंडवाड्याचे बांधकाम करण्यात आले. सद्यस्थितीत कोंडवाड्याची दयनिय अवस्था झाली असून शेतकर्यांना मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील कित्येक महिन्यापासून कोंडवाड्याच्या मुख्य गेटला कुलूप नाही. याबाबत काही नागरिकांनी 'लोकमत'कडे आपल्या व्यथाही मांडल्या. या पृष्ठभूमीवर ११ जुलै रोजी कोंडवाड्याची पाहणी केली. त्यामध्ये कोंडवाड्याच्या मुख्य गेटला कुलूप नसून ते सतत सताड उघडे राहत असल्याचे दिसून आले.
** कोंडवाड्यावरील टिनपत्र्यांची दुरवस्था झाली असून त्यामधून पावसाळ्यात पाण्याची गळती होते.
** कोंडवाड्यात जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता टाके बांधण्यात आले. मात्र त्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याचे दिसून आले
** कोंडवाड्याची इमारत ढिसूळ झाली आहे. त्यामधील खोल्यांना दरवाजा नाही. परिणामी शेतकर्यांनी जनावरे कोंडवाड्यात टाकण्यासाठी आणली असताना पळून जात असल्यामुळे असून ग्रा.पं.चा महसूल बुडत आहे.