आधार क्रमांकातील त्रुटीत अडकला किसान सन्मानचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:25+5:302021-02-05T09:26:25+5:30

वाशिम : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेंतर्गत प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर ...

Kisan Sanman fund caught in error in Aadhaar number | आधार क्रमांकातील त्रुटीत अडकला किसान सन्मानचा निधी

आधार क्रमांकातील त्रुटीत अडकला किसान सन्मानचा निधी

वाशिम : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेंतर्गत प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते. तथापि, विविध त्रुटींमुळे जिल्ह्यातील ३२०५ शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रस्तावातील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असून, अचूक माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

केंद्र शासनाने २०१८ पासून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. वाशिम जिल्ह्यात या योजनेचे १ लाख ९८ हजार ७४३ शेतकरी आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक, आधार क्रमांक, आधारकार्डवरील नाव, बँक आयएफएससी कोड अचूक भरून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आणि प्रस्तावानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानची रक्कमही जमा करण्यास सुरुवात झाली. परंतु, जिल्ह्यातील ३२०५ शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने हे शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत. प्रशासनाने या शेतकऱ्यांची यादी तयार केली असून, या शेतकऱ्यांना तातडीने अचूक आधार क्रमांक, आधारकार्डवरील नाव, बँकेच्या आयएफएससी कोड तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे.

-----------

तहसील कार्यालयात माहितीचे संकलन

विविध त्रुटींमुळे पीएम किसानच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटवाशिमडॉटगव्हडॉटइन या संकेतस्थळावर जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केली असून, या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना तहसीलस्तरावर अचूक माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यात आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, पासबुकच्या प्रतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी व कागदपत्रांवर पूर्ण पत्ता टाकणे आवश्यक आहे.

---------------

पीएम किसानचे जिल्ह्यातील लाभार्थी

तालुका शेतकरी त्रुटी असलेले

वाशिम- ३६७१२ ९९३

मालेगाव- ३२४६५ ६३५

रिसोड- ३५४२७ ४८९

मं.पीर- ३२६४६ ३९५

मानोरा- २७४८५ २१६

कारंजा- ३४००८ ४७८

---------------------------

एकूण- १९८७४३ ३१५३

Web Title: Kisan Sanman fund caught in error in Aadhaar number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.