मेटॅडोर-ऑटोच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: March 24, 2017 02:29 IST2017-03-24T02:28:10+5:302017-03-24T02:29:36+5:30

आठ गंभीर, जखमींवर उपचार; मंगरुळपीर तालुक्यातील घटना.

A killer in the dust of Metador-Auto | मेटॅडोर-ऑटोच्या धडकेत एक ठार

मेटॅडोर-ऑटोच्या धडकेत एक ठार

मंगरुळपीर , दि. २३- मेटॅडोर आणि ऑटोची धडक झाल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वाशिम-मंगरुळपीर मार्गावर अंबापूर फाट्यालगत असलेल्या मारोती मंदिराजवळ गुरुवारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच-0४, ७६९४ क्रमांकाचा मेटॅडोर वाशिमकडून मंगरुळपीरकडे येत होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील अंबापूर फाट्याजवळ मंगरुळपीर येथून धानोराकडे जात असलेल्या एमएच-३७, जी-५९४५ क्रमांकाच्या ऑटोला या मेटॅडोरची जबर धडक बसली. या अपघातात ऑटोमधील प्रवासी धुळाप्पा शिंदे (६0), घटनास्थळीच ठार झाले, तर देवकाबाई कटुले (४0), प्रेमा कडवाल (४५), विष्णू चव्हाण, छायाबाई वाघमारे, द्वारकाबाई कल्याणकर, गजानन शिंदे, गणेश वाघमारे, शेषराव वाघमारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: A killer in the dust of Metador-Auto