युगच्या मारेकर्यांना फाशी द्या!
By Admin | Updated: September 10, 2014 00:24 IST2014-09-10T00:24:02+5:302014-09-10T00:24:02+5:30
युगच्या मारेकर्यांना फाशी द्यावी या मागणीसाठी वाशिम येथील सामाजिक संघटनांचे निवेदन.

युगच्या मारेकर्यांना फाशी द्या!
वाशिम : नागपूर येथील युग चांडक या ८ वर्षीय चिमुकल्याच्या हत्या प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवून या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
नागपूर येथील दंतशल्य चिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा ८ वर्षीय मुलगा युग चांडक याचे राजेश धनालाल दवारे (१९) आणि अरविंद अभिलाष सिंग (२३) या आरोपींनी केवळ द्वेषभावनेतून अपहरण करून हत्या के ली होती. या घटनेचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
वाशिम येथील महेश भवन ट्रस्ट, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी जिल्हा व तहसील संघटन, मारवाडी युवा मंच, तरूण क्र ांती मंचच्या वतीने जिल्हाधिकार्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातूनही सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
** भावपूर्ण श्रद्धांजली
राजस्थानी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन मिनिटे मौन पाळून युगला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली सभेचे संचालन निलेश सोमानी यांनी केले.