खिंड लढविणारेच अडकले ‘खिंडीत’

By Admin | Updated: September 21, 2014 00:58 IST2014-09-20T22:23:33+5:302014-09-21T00:58:23+5:30

वाशिम जिल्ह्यातील राजकीय वास्तव; राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची उमेदवारीसाठी धडपड.

Khandit is stuck in a street tragedy | खिंड लढविणारेच अडकले ‘खिंडीत’

खिंड लढविणारेच अडकले ‘खिंडीत’

वाशिम : आगामी विधानसभा निवडणूकीच्या कुरूक्षेत्रात पक्षांची खिंड लढविण्याची जबाबदारी खांद्यावर असलेले काही पक्षांचे जिल्हाध्यक्षच आजमितील खिंडीत अडकले आहेत. उमेदवारीसाठी प्रयत्नरत असलेल्या या जिल्हाध्यक्षांसमोर स्वपक्षातील काही इच्छूकांनी कडवे आव्हान उभे केल्यामुळे त्यांची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. यामध्ये कॉग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूकीने जिल्ह्यातील राजकीय फिवर शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील विजयाची जबाबदारी स्वाभाविकपणे जिल्हाध्यक्षांची असते. मात्र आजमितीला कॉग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाइं जिल्हाध्यक्षांसमोर पक्षांतर्गत आव्हाण उभे ठाकले आहे.

**कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा रिसोडवर दावा
कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीत कॉग्रेसच्या वाट्यावर असलेल्या रिसोड मतदार संघातून कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाकडे उमेदवारी मागीतली आहे. पक्ष कार्यालयात उमेदवारी मागणीचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी मुंबई येथे पक्ष नेत्यांसमोर मुलाखतही दिली आहे. गतवेळीही जिल्हाध्यक्ष उमेदवारीच्या शर्यतीत होते. मात्र त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. यावेळी मात्र आपला विचार व्हावा यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठीला साकडे घातले आहे. मात्र रिसोडचे विद्यमान आमदार कॉग्रेसचे असुन गत एप्रिल महिन्यात पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीत मोदी लाट असतानाही त्यांनी विजय मिळविला होता.


**शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारंजासाठी इच्छूक
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना कारंजा विधानसभा मतदार संघातून लढण्याचे वेध लागले आहे. मागील निवडणुकीत महायुतीमध्ये हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. सन २00४ च्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराने येथून विजय खेचून आणला होता. गत लोकसभा निवडणूकीतही कारंजा मतदार संघाने महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य दिले होते. त्यामुळेच येथून शिवसेनेच्या उमेदवारीवर लढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहे.

 

Web Title: Khandit is stuck in a street tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.