खडी ग्रा.पं.सरपंच, सचिवावर गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 21:40 IST2017-07-26T21:40:45+5:302017-07-26T21:40:45+5:30

खडी ग्रा.पं.सरपंच, सचिवावर गुन्हा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : १३ व्या वित्त आयोगाच्या कामात अपहार केल्याप्रकरणी खडी येथील सरपंच व सचिवावर २५ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात खडी, एकांबा, आमगव्हाण येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.
बीडीओ एन.टी.,खैरे यांनी तक्रारीत नमूद केले, की सरपंच पंचफुला पांडे, सचिव प्रमोद भगत यांनी संगनमत करुन २०१५-१६ मध्ये १३ व्या वित्त आयोगातील २ लाख ७१ हजार १०० रुपयाच्या निधीचा दुरुपयोग केला. तसेच कमी रस्त्याचे बांधकाम करुन शासकीय निधीचा दुरुपयोग केला. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी सरपंच व सचिवाविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४०८, ४०९, ४६७, १२० ह्यबह्ण ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला आहे.