केकतउम-यात साकारतेय ‘चेतन सेवांकुर’

By Admin | Updated: November 14, 2014 01:29 IST2014-11-14T01:29:44+5:302014-11-14T01:29:44+5:30

दृष्टीहीन चेतनचा डोळस उपक्रम.

In the Kektoum-the 'Chetan Sevakur' | केकतउम-यात साकारतेय ‘चेतन सेवांकुर’

केकतउम-यात साकारतेय ‘चेतन सेवांकुर’

वाशिम : स्वत:च्या जीवनात अंधार असतानाही दोन वर्षात दानशुरांकडून खाऊसाठी मिळालेल्या ९0 हजार रुपयांतून अभ्यासासाठी सौर कंदीलाचे वाटप गरजवंत मुलांना करण्याचे काम चेतन पांडुरंग उचितकरने केले. त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी समाजसेवी संस्थांच्या पुढाकारातून त्याच्या सेवावृत्तीला हक्काचा निवारा देण्याचे काम बालकदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. बालकदिनी केकतउमरा गावात चेतन सेवांकूर निवासाची कोनशिला ठेवली जाणार आहे. वाशिम शहराच्या दक्षिणेकडे ७ किलोमीटर अंतरावर केकतउमरा हे लहानसं गाव वसलेलं आहे. या गावातीलच रहिवासी पांडुरंग उचितकर व गंगासागर या साधारण व्यक्तिमत्त्वाच्या कुटुंबात चेतन व चेतना या अपत्यांचा जन्म झाला. चेतना ही सध्या इयत्ता ११ वी शिकत आहे तर ९ वर्षीय चेतन हा इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. जन्मांध म्हणून जन्माला आलेल्या चेतनने आपल्यातील सुप्त गुणांना अंगिकारुन जिद्द, चिकाटी, बुद्धीच्या बळावर वाशिमच्या नेत्रदान प्रचार समितीचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सर्वत्र ख्याती मिळविली आहे. अंध, बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळविणार्‍या चेतन उचितकरने आपल्यातील कला गुणांचा विकास करुन वक्तृत्व, गायन व संगीतच्या माध्यमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा व कर्नाटक या राज्यात नेत्रदान, कन्याभृण हत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती, हुंडाबळी व स्वच्छता अभियान या विषयावर प्रबोधन करुन छाप सोडली आहे. परिसरातील पार्डी एकबुर्जी, सुरकुंडी, घानमोडी व वाशिमच्या राजेंद्र प्रसाद शाळेतील ५00 विद्यार्थ्यांना साबण व नेलकटर वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या चेतन उचितकरची दखल घेऊन मुंबई येथील दिलासा व प्रयास या केअरिंग फ्रेन्डसच्या आर्थिक पाठबळामुळे तसेच केकतउमरा गावातील शेतकरी तुकाराम वाशिमकर यांच्या सहकार्य तर जालना येथील अंकुश अडसूळ यांचा तांत्रिक सहकार्याने उचितकरांच्या चंद्रमौळी झोपडीचा कायापालट होऊन चेतन सेवांकूर साकारत आहे.

Web Title: In the Kektoum-the 'Chetan Sevakur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.