उमेदवाराच्या खर्चावर ‘वॉच’ ठेवा!
By Admin | Updated: September 25, 2014 01:50 IST2014-09-25T01:28:39+5:302014-09-25T01:50:13+5:30
निवडणूक निरिक्षक सिंग याच्या सूचना : अधिका-यांची घेतली बैठक.

उमेदवाराच्या खर्चावर ‘वॉच’ ठेवा!
वाशिम : विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये प्रत्येक उमेदवारांकडून करण्यात येणार्या खर्चावर बारकाईन लक्ष ठेवा, उमेदवारांकडून भेट वस्तू वाटपा सारख्या अवैध बाबींसाठी कोणताही खर्च होऊ नये, याचीही दक्षता घ्या अश्या सुचना जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक सुखचैन सिंग यांनी दिल्या. जिल्ह्यातील निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठकीत सिंग बोलत होते. सुखचैन सिंग यांची वाशिम जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. २३ सप्टेंबरला सिंग वाशिममध्ये दाखल झाले असून त्यांनी खर्च विषयक बाबींवर निरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला.