विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी समन्वय ठेवा !
By Admin | Updated: October 6, 2014 00:39 IST2014-10-06T00:39:58+5:302014-10-06T00:39:58+5:30
सामान्य निवडणूक निरीक्षक इंदू धर यांचे अधिकार्यांना मार्गदर्शन.

विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी समन्वय ठेवा !
वाशिम : प्रत्येक निवडणूक ही शासकीय यंत्रणेसाठी एक आव्हान असते. सदर आव्हान पेलण्यासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकार्यांनी आपल्या अनुभवाचा योग्य वा पर करणे व परस्परांमध्ये समन्वय ठेवून काम करावे लागते. विधानसभा निवडणुकीतही जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकार्यांनी असाच समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक इंदू धर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी व निवडणूक यंत्रणेतील इतर अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक सुखचैन सिंग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे यांच्यासह रिसोडचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक अमनकर, कारंजाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनकर काळे, वाशिमचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.