कारखेडा जि. प. शाळेची यशोगाथा राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:22+5:302021-07-30T04:43:22+5:30
मानोरा : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्यावतीने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही ...

कारखेडा जि. प. शाळेची यशोगाथा राज्यस्तरावर
मानोरा : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्यावतीने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक शाळांच्या केस स्टडीज्चे संकलन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मानोरा तालुक्यातील जि. प. शाळा कारखेडा या शाळेची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबादच्यावतीने एक अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील काही शाळा या उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करतात. जसे की, या शाळा जीवन जगण्याची कला शिकवितात. लोकवर्गणीतून शंभर टक्के डिजिटल होणाऱ्या शाळा, अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शाळा... अशा शाळांना प्रोत्साहन म्हणून व राज्यातील इतर शाळांना एक आदर्श म्हणून ओळख व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात जि. प. शाळा कारखेडा या शाळेची यशोगाथा राज्यस्तरीय पुस्तिका 'शाळेची यशोगाथा'मध्ये प्रकाशित होणार आहे. ही मानोरा तालुक्यासाठीच नव्हे, तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या शाळेला प्रगतिपथावर नेण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठा लोकसहभाग उपलब्ध करून दिला तथा डायट वाशिमची टीम व मानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणधिकारी अनिल पवार, केंद्रप्रमुख अशोक ठाकरे, गावाच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके, जि. प.चे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, शिक्षक रणजित जाधव, शिक्षिका कविता चौधरी यांचा मोलाचा वाटा आहे.
शाळेच्या प्रत्येक उपक्रमात गावाच्या नागरिकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळेच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळाली.
- गोविंद पोतदार, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कारखेडा