कारंजा लाड : कारंजा मूर्तिजापूर या कारंजा आगाराच्या एस टी बसला अपघात झाल्याची घटना ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात घडली. अधिक माहितीनुसार कारंजा आगाराची एम एच ०७ सी ९४२० क्रमांकाची बसमधील चालक, वाहक व ५ प्रवासी घेवून ७ मार्च रोजी कारंजाहून मूर्तिजापूरकडे जात असताना समोरून भरधाव येणाºया एच आर ३७ डी २७६९ क्रमांकाच्या ट्रकपासून होणाºया अपघातातून बचाव करण्याकरीता रोडच्या दुसºया बाजूला चालकाने एस टी बस वळवल्याने हा अपघात घडला. अपघातात रस्ता दुभाजक एस टी बसला लागल्याने एसटीचे नुकसान झाले. अशी माहिती चालकांने दिली. परंतू एस टी बस भरधाव वेगात होती व समोरून येणारा ट्रक चालकाचे लक्ष नसल्याने अचानक समोर आल्याने अपघात टाळण्यासाठी चालकाने रोडच्या दुसºया बाजूला एस टी बस वळवल्याने हा अपघात झाल्याची माहिती एसटीतील प्रवाशांनी दिली. अपघातानंतर प्रवाशांना दुसºया एस टी बसमध्ये बसून देण्यात आले.
कारंजा - मूर्तिजापूर एसटी बसला अपघात; प्रवासी सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:09 IST
कारंजा लाड : कारंजा मूर्तिजापूर या कारंजा आगाराच्या एस टी बसला अपघात झाल्याची घटना ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात घडली.
कारंजा - मूर्तिजापूर एसटी बसला अपघात; प्रवासी सुरक्षित
ठळक मुद्देअपघातात रस्ता दुभाजक एस टी बसला लागल्याने एसटीचे नुकसान झाले.अपघातानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसमध्ये बसून देण्यात आले.