‘काचिगुडा-अजमेर’ विशेष फेरी धावणार
By Admin | Updated: March 28, 2016 02:24 IST2016-03-28T02:24:45+5:302016-03-28T02:24:45+5:30
दक्षिण मध्य रेल्वे विभागाची भेट.

‘काचिगुडा-अजमेर’ विशेष फेरी धावणार
शिखरचंद बागरेचा / वाशिम
देशातील मुस्लीम अनुयायींचे ङ्म्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील अजमेर शरीफ दर्गाच्या उर्स कार्यक्रमानिमित्त मुस्लीम समाज बांधवांना दर्शनासाठी जाता यावे म्हणून दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काचिगुडा अजमेर काचिगुडा ही विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य जुगलकिशोर कोठारी यांनी २७ मार्च रोजी दिली. अजमेर शरीफ येथे ऊर्स कार्यक्रमदरम्यान काचीगुडा अजमेर ही 0७१२९ क्रमांकाची रेल्वेगाडी सोमवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता काचिगुडा रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल. सदर रेल्वे अजमेर येथे गुरुवार १३ एप्रिल रोजी पहाटे ७ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात 0७१३0 क्रमांकाची अजमेर काचिगुडा ही रेल्वे १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.२७ वाजता अजमेरहून काचिगुडाकडे रवाना होईल, अशी माहिती जुगलकिशोर कोठारी यांनी दिली. एकूण १४ डब्यांच्या असलेल्या या रेल्वेगाडीला एक द्वितीय ङ्म्रेणी वातानुकूलित, एक तृतीय ङ्म्रेणी, आठ स्लीपर कोच, दोन साधारण ङ्म्रेणी व दोन लगेज असे डब्बे राहणार आहे. ही रेल्वे काचिगुडा येथून निघाल्यानंतर मलकाजगिरी, मेडचल, कामारेडडी, निजामाबाद, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी भोपाल, बैरागड, सिहोट, शुजालपूर, उज्जैन, नागदा, पावरा, भंदसौर, निमच, चित्तोडगड, भिलवाडा, विजयनगर, नसिराबाद मार्गे अजमेर शरीक येथे पोहोचणार आहे.