पाॅलिस करण्याच्या बहाण्याने दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST2021-09-25T04:44:45+5:302021-09-25T04:44:45+5:30
येथील शिवाजी शाळेजवळ नंदु नामदेव सोळंके व दिलीप नामदेव सोळंके हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह राहतात. विळे,पावस्या विक्रीचा व ...

पाॅलिस करण्याच्या बहाण्याने दागिने पळविले
येथील शिवाजी शाळेजवळ नंदु नामदेव सोळंके व दिलीप नामदेव सोळंके हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह राहतात. विळे,पावस्या विक्रीचा व वेल्डिंगचा व्यवसाय त्यांचा आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी नंदू सोळंके व त्यांची पत्नी सोयाबीन सोंगणी करिता लागणारे विळे बनवित असतांना त्यांच्या घरी एक मुलगा पाठीवर बॅग घेऊन आला व माझ्याकडे घरातील सोन्या चांदीचे दागिने पाॅलिस करण्यासाठी पावडर व लिक्विड आहे. हा कंपनीचा प्रचार असून मी तुमचे दागिने फ्री मध्ये पाॅलिस करुन चकाकून देतो असे सांगितले. चंद्रकला नंदू सोळंके यांनी अंगावरील १ ग्राम सोन्याचे मणी मंगळसूत्र, १५ तोळे चांदीच्या पाटल्या, १२ तोळे चांदीचे पैजण व नंदा दिलीप सोळंके यांनी हातातील १५ तोळे चांदीच्या पाटल्या असे अंदाजे ३५ ते ४० हजार रुपये किमतीचे दागिने घेतले व त्यांच्याच घरातील प्रेशर कुकरमध्ये पावडर, दागिने टाकले व कुकर गॅसवर ठेवण्यास सांगून दहा मिनिटांनी दागिने स्वच्छ व चमकदार होतील म्हणून तेथून निघून गेला. मात्र नंदा सोळंके यांना शंका आल्याने त्यांनी गॅसवर ठेवलेल्या कुकरमध्ये चमचा फिरवून दागिन्याची पाहणी केली असता कुकरमध्ये दागिने नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच आपल्या घरच्यांना दागिने कुकरमध्ये नसल्याचे सांगताच लाल कलरच्या पल्सर दुचाकीने आलेल्या त्या भामट्याला शोधण्यासाठी सर्वांनी धावपळ सुरु केली, मात्र त्यांची धावपळ व्यर्थ गेली. या घटनेची माहिती जऊळका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.