जावयाने केली सासरवाडीत आत्महत्या

By Admin | Updated: November 14, 2015 02:20 IST2015-11-14T02:20:43+5:302015-11-14T02:20:43+5:30

रिसोड तालुक्यातील लेहणी गावातील घटना

Javanese committed suicide in Sasarwadi | जावयाने केली सासरवाडीत आत्महत्या

जावयाने केली सासरवाडीत आत्महत्या

रिसोड (जि. वाशिम): दिवाळी सणानिमित्त सासरवाडीत आलेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाऊबीजलाच रिसोड तालुक्यातील लेहणी शेतशिवारात दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
ज्ञानेश्‍वर लक्ष्मण शेजुळ (४२) असे मृतकाचे नाव असून, ते तालुक्यातील गोहगाव दांदडे येथील रहिवासी होते. याविषयी प्राप्त माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर शेजुळ यांचे दोन विवाह झाले आहेत. दुसर्‍या पत्नीसोबत ते गोहगाव दांदडे येथे वास्तव्यास होते. मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दैनंदिन परिस्थितीचा सामना करताना ते हतबल झाले होते. यातूनच हा घटनाक्रम घडल्याचे बोलले जात आहे. पहिल्या पत्नीची दोन मुले व मुलगी, तर दुसर्‍या पत्नीचा मुलगा यांच्यासह सहा सदस्यांचे हे कुटुंब हे गोहगाव येथे एकत्र राहत होते. पहिल्या पत्नीच्या तिन्ही मुलांना मामाच्या गावी, सासरवाडीत लेहणी येथे दिवाळीनिमित्त ज्ञानेश्‍वर शेजुळ घेऊन आला होता. लेहणी येथीलच शेतशिवारातील ज्ञानबा हुले यांच्या शेतात भाऊबीजच्या दिवशी दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
ज्ञानेश्‍वर शेजुळ यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, अशातच त्यांच्या अचानक जाण्याने पत्नी व मुलांवर जणू आभाळच कोसळल्यासारखे मोठे दु:ख उभे ठाकले आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांचे दु:ख पाहून शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Javanese committed suicide in Sasarwadi