झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी बांधवांकडून जनसेवा
By Admin | Updated: March 29, 2017 20:28 IST2017-03-29T20:28:51+5:302017-03-29T20:28:51+5:30
झुलेलाल जयंतीनिमित्त वाशिमसह कारंजा शहरातील सिंधी बांधवांकडून जनसेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी बांधवांकडून जनसेवा
वाशिम: झुलेलाल जयंतीनिमित्त वाशिमसह कारंजा शहरातील सिंधी बांधवांकडून जनसेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
सिंधी बांधवांचे आराध्य दैवत असलेले झुलेलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सिंधी बांधवांच्यावतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये झुलेलाल जयंतीनिमित्त झुलेलाल महाराज मंदिरात सकाळी प्रार्थना व पुजाविधी पार पडला. यानिमित्त वाशिम आणि कारंजा शहरातून भव्य पालखीही फिरविण्यात आली. त्याशिवाय विविध ठिकाणी भाविकांसाठी प्रसाद व सरबताचे वाटप करण्यात आले. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.