पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्यासाठी जनप्रबोधन
By Admin | Updated: October 27, 2016 13:53 IST2016-10-27T13:52:12+5:302016-10-27T13:53:01+5:30
फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्यासासाठी वाशिममध्ये जनप्रबोधन करण्यात आले.

पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्यासाठी जनप्रबोधन
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ - फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेना व इको क्लबने राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकूंद जोशी , प्राचार्य मिना उबगडे यांच्या मार्गदर्शनात जनप्रबोधन येथील फटाक मार्केटमध्ये २७ आॅक्टोंबर रोजी करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक दिपावली साजरी करण्याचे संकल्प पत्र भरुन घेण्यत आले.
एसएमसी शाळेच्यावतिने दरवर्षी या प्रकाराचे आवाहन करुन यासंदर्भात पुढाकार घेतल्या जाते. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण, लहन मुलांच्याा श्रवणावर परिणाम, वृध्दांना त्रास, दमा असणा-या नागरिकांना त्रास होतो. फटाक्यामध्ये तांबे, कॅडिनीयम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त असल्याने हे आरोग्यास धोकादायक अहेत. यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.