गोरगरीबांना मार्गदर्शनासाठी फिरता जनता दरबार
By Admin | Updated: April 27, 2017 13:55 IST2017-04-27T13:55:39+5:302017-04-27T13:55:39+5:30
समस्या सोडविण्यात हातभार लावण्यासाठी ‘आम दल’ या सामाजिक संघटनेने आगळा वेगळा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

गोरगरीबांना मार्गदर्शनासाठी फिरता जनता दरबार
समस्या सोडविण्याचा प्रयत्न: ह्यआम दलह्ण सामाजिक संघटनेचा उपक्रम
मंगरुळपीर: मूलभूत गरजांच्या जटील समस्यांने त्रस्त असलेली जनता या समस्यांतून बाहेर पडण्यासाठी सतत धडपडत असते. तथापि, अपुरे अज्ञान आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या समस्येतून बाहेर पडणेच शेवटपर्यंतही शक्य होत नाही. त्यांना मार्गदर्शन करून या समस्या सोडविण्यात हातभार लावण्यासाठी ह्यआम दलह्ण या सामाजिक संघटनेने आगळा वेगळा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी येत्या ३० एप्रिल ते ३० मे पर्यंत महिनाभराच्या कालावधित त्यांच्यावतीने ह्यफिरता जनता दरबारह्ण आयोजित करून मातंग समाजासह इतर गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.