शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
5
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
6
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
8
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
9
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
10
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
11
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
12
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
13
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
14
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
15
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
16
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
17
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
18
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
19
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता कर्फ्यू’ : वाशिम शहरात बाजारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:31 IST

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असला, तरी काही रस्त्यांवर वर्दळ कायमच असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरासह तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी वाशिम शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली. या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीच्या दोन दिवसानंतर १८ सप्टेंबर रोजी तिसºया दिवशीही वाशिमची बाजारपेठ कडकडीत बंद होती. कामानिमित्त घराबाहेर पडणाºयांची गर्दी रस््त्यांवर दिसून येत होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असला, तरी काही रस्त्यांवर वर्दळ कायमच असल्याचे दिसून आले.दरम्यान, मालेगाव येथेही जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असून, १८ सप्टेंबरला येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला असून, मृत्यूची संख्या आता पाऊणशेकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंतच कोरोनाबाधितांची संख्या ३२११ रुग्णसंख्या असून, यापैकी ८२५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. सप्टेंबर महिन्यात वाशिम शहरातील कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या घरात पोहोचण्या स्थितीत आली. त्यानंतरही बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरातील व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून वाशिम शहरात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. त्यात पहिल्याच दिवसापासून दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री आणि काही अपवाद वगळता बाजारपेठ ८० टक्के बंदच होती. जनता कर्फ्यूच्या तिसºया दिवशी मात्र सुरुवातीच्या दोन दिवसांपेक्षाही कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरही महत्त्वाच्या कामासांठी येजा करणारे पादचारी आणि वाहनचालक वगळता रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक