जन भागीदारी ते जन आंदोलन, वाशिम येथे आज ‘फ्रीडम रन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:44+5:302021-09-18T04:44:44+5:30
वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्रामार्फत आज, शनिवारी सकाळी सात वाजता वाशिम येथे जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे ...

जन भागीदारी ते जन आंदोलन, वाशिम येथे आज ‘फ्रीडम रन’
वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्रामार्फत आज, शनिवारी सकाळी सात वाजता वाशिम येथे जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘जन भागीदारी ते जन आंदोलन’ या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, अनिल ढेंगे यांनी केले आहे.
शनिवारी सकाळी सात वाजता आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथून जिल्हास्तरीय फ्रीडम रनला सुरुवात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती राहील.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्ह्यात १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ७५ गावांमध्ये फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी संदेश देण्यात येत आहे. ‘जन भागीदारी ते जन आंदोलन’ या संकल्पनेतून युवकांचे आरोग्य सदृढ राहावे, त्यांनी दररोज विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा, इतरांनाही आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी जागृत करावे, याविषयी फ्रीडम रनच्या माध्यमातून संदेश दिला जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन पंत व ढेंगे यांनी केले आहे.