जलसंधारणाबाबत जलतज्ज्ञांची गावोगावी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:38 IST2017-09-04T19:37:42+5:302017-09-04T19:38:16+5:30
वाशिम - जलसंधारणाच्या कामांतून स्वत:च्या गावाला पाणीटंचाईतून बाहेर काढल्यानंतर आता जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी गावोगावी जनजागृती करण्याच्या कार्याला सुरूवात केली आहे. ४ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील केकतउमरा, भटउमरा, एकांबा येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले.

जलसंधारणाबाबत जलतज्ज्ञांची गावोगावी जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जलसंधारणाच्या कामांतून स्वत:च्या गावाला पाणीटंचाईतून बाहेर काढल्यानंतर आता जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी गावोगावी जनजागृती करण्याच्या कार्याला सुरूवात केली आहे. ४ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील केकतउमरा, भटउमरा, एकांबा येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले.
२०१४ पर्यंत टँकरग्रस्त म्हणून ओळख असलेल्या दोडकी गावात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यामुळे गावाची टँकरग्रस्त अशी ओळख पुसल्या जाऊन टँकरमुक्त गाव म्हणून नवीन ओळख प्राप्त झाली. याकामी जलतज्ज्ञ सुभाष नानवटे यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नानवटे यांनी गावोगावी कार्यक्रम घेण्याला सुरूवात केली. सोमवारी केकतउमरा, भटउमरा व एकांबा येथे कार्यक्रम घेऊन पाण्याचे महत्त्व पटवून दिले. माती व पाणी या विषयावर गावकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. पावसाचा पडणारा थेंब मातीत जिरवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. रामेश्वर काटेकर, सिताराम वाशिमकर यांच्यासह सुभाष नानवटे यांनी मार्गदर्शन केले.