हत्या करणारा आरोपी जेरबंद
By Admin | Updated: October 8, 2014 00:35 IST2014-10-08T00:35:36+5:302014-10-08T00:35:36+5:30
जवळा येथील हत्येचा आरोपीस अनसिंग पोलिसांनी केले अटक.

हत्या करणारा आरोपी जेरबंद
अनसिंग (वाशिम): वाशिम तालुक्यातील जवळा येथील ४८ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणार्या आरोपीला जेरबंद करण्यात अनसिंग पोलिसांना यश आले आहे. प्रदीप रामसिंग चव्हाण (ठाकूर) (वय १९ वर्षे) असे आरोपीचे नाव असून तो अनसिंगचा रहिवासी आहे. जवळा येथील हरिभाउ बळीराम नागरे यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना जवळा शेतशिवारात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.