शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा: जागावाटप झाल्यानंतरच लढतींचे चित्र होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 02:57 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र :सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची मोर्चेबांधणी, विधानसभा मतदारसंघावर मित्रपक्षांचा दावा

नंदकिशोर नारे वाशिम : कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीत जागा वाटप कशाप्रकारे होते, यावरच येत्या विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील राजकीय चित्र ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३ पैकी २ जागा भाजपने तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. गेल्यावेळी भाजपा-शिवसेना दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते त्यामुळे आता जागा वाटपाचा गुंता होण्याची चिन्हे आहेत. २०१४ पूर्वी शिवसेनेच्या वाटयाला आलेला कारंजा मतदारसंघ आता पुन्हा आपल्याला मिळावा या साठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्यातरी दोन्ही मित्रपक्षातील इच्छुकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सदर जागा भाजपाच्या वाटयास आल्यास येथे शिवसेनेमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तविल्या जात आहे. भारिप-बहुजन महासंघाने (वंचित आघाडी) यावेळी कारंजा सर करण्यासाठी तयारी चालविली आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असून या मतदारसंघात स्वपक्षातील इच्छुकांनी उमेदवारीमध्ये बदल करण्याची मागणी पक्षाकडे केल्याने विद्यमान आमदार लखन मलिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस पक्षातर्फे सुध्दा या मतदारसंघात इच्छुकांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. येत्या निवडणुकीत भाजपाच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसच्यावतिने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. आमदार अमित झनक यांनी मोदी लाटेतही हा गड राखला होता त्यामुळे ते कसे आव्हान पेलतात हे पाहणे रंजक ठरेल.

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री, खासदार अनंतराव देशमुख सद्यस्थितीत शांत दिसून येत आहेत. त्यांचे पुत्र अ‍ॅड. नकुल देशमुख निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांची भूमिकाही परिणाम करणारी ठरेल अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघावर शिवसंग्रामनेही दावा केला असल्याने युतीसमोरही पेच निर्माण होणार आहे.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :रिसोड : अमित झनक (काँग्रेस) । मते : ७०,९३९ फरक १६,७०८.सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : कारंजा : युसूफ पुंजाणी(भारिप-बहुजन महासंघ) - ४,१४७ ( विजयी - राजेंद्र पाटणी, भाजपा).

एकूण जागा : ३ । सध्याचे बलाबल भाजप - २, कॉँग्रेस-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा