पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा प्रश्न गुलदस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:04+5:302021-09-12T04:47:04+5:30
०००००००००००००००० जबाबदारी पार पाडावी कशी कोट: जिल्ह्यात २०१५-१६ नंतर पोलीस पाटलांची भरतीच झाली नाही. सद्यस्थितीत २२९ पदे रिक्त असून, ...

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा प्रश्न गुलदस्त्यातच
००००००००००००००००
जबाबदारी पार पाडावी कशी
कोट: जिल्ह्यात २०१५-१६ नंतर पोलीस पाटलांची भरतीच झाली नाही. सद्यस्थितीत २२९ पदे रिक्त असून, या गावांचा प्रभार इतर पोलीस पाटलांकडे देण्यात आला आहे. त्यात पाच महिन्यांपासून मानधन थकल्याने जबाबदारी पार पाडावी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- वासुदेव सोनुने
जिल्हा सचिव, पोलीस पाटील संघटना
००००००००००००००००००००
कोट: गेल्या अनेक दिवसांपासून माझ्याकडे तीन गावांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यात गेल्या पाच महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. त्यामुळे तिन्ही गावाच्या कायदा सुव्यवस्थेसाठी पदरचा खर्च करून पोलीस व महसून प्रशासनाला सहकार्य करावे लागत आहे.
-छाया डहाके,
पोलीस पाटील भुली.
००००००००००००००००
कोट: पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्याने आमच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. एखाद्या गावात गुन्हा घडला, बेवारस मृतदेह आढळला, तर प्रत्यक्ष पाहणी करून पोलिसांना माहिती द्यावी लागते. मानधन थकले असून, पदरचा खर्च करून जबाबदारी पार पाडावी कशी.
-विजय सरोदे
पोलीस पाटील, जऊळका रेल्वे.
०००००००००००००००००
कोट: गेल्या पाच महिन्यांपासून मानधन थकले आहे. कोरोना काळापासून आम्ही स्वत:च्या जिवाची व कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता प्रशासनाला सहकार्य करीत आहोत. आधीच मानधन थकले असताना अतिरिक्त प्रभारामुळे जबाबदारी पार पाडावी कशी, असा प्रश्न आहे.
-अनिता चोथमल,
पोलीस पाटील, जऊळका रेल्वे.
पोलीस स्टेशन निहाय मंजूर, कार्यरत व रिक्त पदे
तालुका - मंजूर - कार्यरत - रिक्त
वाशिम - ७८ - ४४ - ३४
मंगरुळपीर - ५७ - २८ - ८५
जऊळका रेल्वे -४३ - १८ - २५
शिरपूर जैन -५९ -३७ - २२
रिसोड - ६६ -४२ - २४
मालेगाव -४५ - ३१ - १४
आसेगाव -५१ - ३५ - १६
धनज -४८ -४० - ०८
कारंजा - ५९ -४७ - १२
मानोरा -८६ -५८ - २८
--------------------- ---