धावत्या एसटी समोर इसमाने घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 20:04 IST2017-09-17T19:43:49+5:302017-09-17T20:04:32+5:30
महामंडळाच्या धावत्या बसवरसमोर उडी मारून एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना मंगरूळपीर येथील अकोला चौकात रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

धावत्या एसटी समोर इसमाने घेतली उडी
ठळक मुद्देमंगरूळपीर येथील अकोला चौकात रविवारी सकाळी घडली घटनाअनोळखी इसमाने धावत्या एसटी बससमोर घेतली उडीमृत पावलेल्या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महामंडळाच्या धावत्या बसवरसमोर उडी मारून एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना मंगरूळपीर येथील अकोला चौकात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. अमरावती-वाशिम ही बस नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजतादरम्यान मंगरूळपीर येथील अकोला चौकातून जात असताना, एका अनोळखी इसमाने अचानक या बसखाली उडी मारली. या घटनेत सदर इसमाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत.