विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST2021-01-10T04:31:27+5:302021-01-10T04:31:27+5:30
ग्राम जांब (कारंजा) येथील धनराज सोमला जाधव हे शुक्रवारी ८ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांना पत्नी, दोन मुले व दोन ...

विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या
ग्राम जांब (कारंजा) येथील धनराज सोमला जाधव हे शुक्रवारी ८ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांना पत्नी, दोन मुले व दोन मुली आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते गावात एकटेच राहून उदरनिर्वाह करीत होते. जांब शेतशिवारातील धरणालगत असलेल्या अमित वानखडे यांच्या शेतातील विहिरीत सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदरे यांनी तातडीने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोलाम, मुरलीधर उगले, नितीन पाटील, भोयर पाटील व घुले यांना घटनास्थळी रवाना केले. मृतदेह कुजल्यामुळे उंबर्डा बाजार आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. आर. नांदे तथा डॉ. आडे यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केली. त्यानंतर घटनास्थळीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.