३२ वर्षीय इसमाचा धरणातील पाण्यात बुडून मुत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:19+5:302021-09-08T04:50:19+5:30

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, गणेश कान्हेरे (३२, रा. मोहगव्हाण) हा इसम मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नित्यनेमाप्रमाणे मासे पकडण्याकरिता ...

Isma, 32, drowned in a dam | ३२ वर्षीय इसमाचा धरणातील पाण्यात बुडून मुत्यू

३२ वर्षीय इसमाचा धरणातील पाण्यात बुडून मुत्यू

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, गणेश कान्हेरे (३२, रा. मोहगव्हाण) हा इसम मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नित्यनेमाप्रमाणे मासे पकडण्याकरिता मोहगव्हाण येथील धरणाजवळ गेला होता. मासे पकडत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो त्यात वाहून गेला. या घटनेत गणेश कान्हेरे याचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शोकाकूल वातावरणात कुटुंबीयांकडून गणेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून आगामी दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासह पूरसदृष परिस्थितीदेखील निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन शक्यतोवर धरण, नदी-नाल्यांच्या काठी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Isma, 32, drowned in a dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.