अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST2021-09-26T04:45:29+5:302021-09-26T04:45:29+5:30
कारंजा लाड : तालुक्यातील धनज बु. पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कारंजा-अमरावती रोडवरील अकोली जहागीर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार
कारंजा लाड : तालुक्यातील धनज बु. पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कारंजा-अमरावती रोडवरील अकोली जहागीर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत एक इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली.
धोत्रा जहागीरचे पोलीस पाटील नीलेश धाये यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री कारंजा-अमरावती महामार्गावर अकोली फाट्यानजीक अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात मसला येथील नाजूक भगवान थोरात (५३) हे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून धनज येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४ अ, २७९ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे करीत आहेत.