वाशिम जिल्ह्यात पेरण्यांची लगबग वाढली
By Admin | Updated: July 17, 2014 01:13 IST2014-07-17T01:05:51+5:302014-07-17T01:13:13+5:30
१५ जुलैच्या पावसाने सुखावलेल्या शेतकर्यांनी १६ जुलैला पेरण्यांना गती दिली असल्याचे दिसून आले.

वाशिम जिल्ह्यात पेरण्यांची लगबग वाढली
वाशिम : जिल्ह्यात १५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस सलग दुसर्या दिवशीही प्रसन्न होता. वाशिमसह कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत रिमझिम बरसत होता. १५ जुलैच्या पावसाने सुखावलेल्या शेतकर्यांनी १६ जुलैला पेरण्यांना गती दिली असल्याचे दिसून आले
यंदा मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी पेरण्या उरकल्या होत्या; परंतु मृगात रिमझिम बसणार्या पावसाने त्यानंतर मात्र अचानक दडी मारली. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. शेतकर्यांनी पेरलेली बियाणे अंकुरली खरी; मात्र पावसाअभावी यातील बहुतांश पिके करपू लागली होती. १५ जुलैपासून पुन्हा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा पेरण्यांची लगबग सुरू झाल्याचे दिसून आले.
बुधवारचा पाऊस
तालुका झालेला पाऊस
वाशिम 0९.३0 मि.मि.
मालेगाव 0५.४0 मि.मि.
रिसोड १३.00 मि.मि.
मंगरुळपीर 0३.२0 मि.मि.
मानोरा 0२.८0 मि.मि.
कारंजा 0६.00 मि.मि.