रिठद उपकेंद्रावरुन अनियमित विजपुरवठा
By Admin | Updated: October 2, 2014 01:00 IST2014-10-02T01:00:23+5:302014-10-02T01:00:23+5:30
गत ५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत

रिठद उपकेंद्रावरुन अनियमित विजपुरवठा
हिवरापेन : येथून जवळच असलेल्या रिठद येथे गत ५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रिठद उपकेंद्रामधील हिवरापेन, पार्डी, येवता येथील कृषींपपधारक या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत. रिठद उपकेंद्रामधून या तिन्ही गावांना ५ ते ६ दिवस झाले लाईनच नाही. तीनही गावातील १00 शे तकरी रिठदला २९ सप्टेंबरला गेले असता उपअभियंता सांगळे हजर नव्हते, त्यावेळी गोरे भेटले असता तुमचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिले, परंतु दुसर्यादिवशी विद्युतपुरवठा जैसे थे च्या अवस्थेत आढळून आला.
याच उपकेंद्रामध्ये काही गावांना १६ तास विद्युत पुरवठा सुरू आहे तर काही गावाना ३ ते ४ तास विद्युत पुरवठा होत आहे. एकाच उपकेंद्रामध्ये अशी तफावत दिसून येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. भारनियमनाव्यतिरिक्त विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा रात्रीच्यावेळी रात्र-रात्र भर सुरळीत राहत नसल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागत आहे. रात्रीच्यावेळी बिघाड झाल्यानंतर कोणीही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये विद्युत वितरण कंपनीविरूध्द रोष व्यक्त केल्या जात आहे.या प्रकारामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. एकीकडे सोयाबीनवरील रोग अनेक शेतावरील सोयाबीन पिवळया मॉझीक मुळे पुर्ण हा वाळत आहे.