आयपीएल सट्ट्यावर धाड; ३.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

By Admin | Updated: May 19, 2017 01:07 IST2017-05-19T01:07:20+5:302017-05-19T01:07:20+5:30

वाशिम : विशेष पथक तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वाशिममधील सौदागरपुरा परिसरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले.

IPL betting racket; 3.64 lakh worth of money seized! | आयपीएल सट्ट्यावर धाड; ३.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

आयपीएल सट्ट्यावर धाड; ३.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विशेष पथक तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वाशिममधील सौदागरपुरा परिसरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले. आरोपींकडून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई १७ मे रोजी सायंकाळी करण्यात आली.
संयुक्त पथकाच्या सौदागरपुरा परिसरात फराईमभाई इस्माईलभाई यांच्या इमारतीत टाकलेल्या धाडीमध्ये कैलास संजयकुमार बसंतवाणी (२१), अंकीत अशोक वर्मा (२७ ), अमीत मनोज रुपचंदाणी (२१ ), राहूल जयंत पारसवाणी (२५), अजहर अहमद मकसूद अहमद (४३) हे आयपीएलमधील हैद्राबादविरूद्ध कलकत्ता नाईट राईडर्स या क्रिकेट मॅचवर जुगार खेळताना आढळून आले. संयुक्त पथकाने त्यांना अटक करून त्यांच्या जवळून रोख रक्कम ४९ हजार २५०, १० मोबाइल संच, टि.व्ही. मॉनिटर, सेटअप बॉक्स, कुलर, मोटार सायकल, व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: IPL betting racket; 3.64 lakh worth of money seized!