‘मार्जिन मनी योजने’साठी प्रस्ताव मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:49+5:302021-02-05T09:28:49+5:30
००० फिरत्या पथकाद्वारे पोलिओ लसीकरण रिठद : रविवार, ३१ जानेवारी रोजी पोलिओचा डोस न घेणाऱ्या बालकांना १ फेब्रुवारी रोजी ...

‘मार्जिन मनी योजने’साठी प्रस्ताव मागविले
०००
फिरत्या पथकाद्वारे पोलिओ लसीकरण
रिठद : रविवार, ३१ जानेवारी रोजी पोलिओचा डोस न घेणाऱ्या बालकांना १ फेब्रुवारी रोजी फिरत्या पथकाद्वारे तसेच रिठद येथील बसथांब्यावर पोलिओ डोस पाजण्यात आला.
०००
महा आवास अभियानांतर्गत जनजागृती
केनवड : अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणे, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करणे, अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे, आदी उद्देशांतून महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. १ फेब्रुवारी रोजी केनवड परिसरात पंचायत समितीच्या चमूतर्फे जनजागृती करण्यात आली.
००००००
पंचायत विभागाचा प्रभार संजय जोल्हेंकडे
वाशिम : जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद गत दीड वर्षांपासून रिक्त आहे. या पदाचा प्रभार गटविकास अधिकारी कालिदास तापी, त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांच्याकडे सोपविला होता. आता या पदाचा प्रभार महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्याकडे सोपविला.
००००
फेरीवाले रस्त्यावर; वाहतूक प्रभावित !
रिसोड : रिसोड शहरातील मुख्य रस्त्यालगत उभे राहून फेरीवाले हे विविध प्रकारच्या साहित्याची विक्री करीत असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा या दरम्यान सोमवारी दुपारच्या सुमारास वाहतूक प्रभावित झाली होती.
00
बँकेत ग्राहकांची गर्दी वाढली
वाशिम : कोरोनाकाळातही वाशिम शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असल्याचे सोमवारी, १ फेब्रुवारी रोजी दिसून आले. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याकडे अनेक ग्राहकांचे दुर्लक्ष होत आहे.