लोकशाहीच्या सणाचे मतदारांना निमंत्रण
By Admin | Updated: October 7, 2014 01:15 IST2014-10-07T01:15:06+5:302014-10-07T01:15:06+5:30
वाशिम जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी राबवला जाणार अनोखा उपक्रम.

लोकशाहीच्या सणाचे मतदारांना निमंत्रण
वाशिम : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सण. हा सण दसरा, दिवाळी, ईद सारख्या पारंपारिक सणासोबत जोडून आला आहे. त्यामुळे या सणाच्या वातावरणामध्ये मतदारांना मतदानास येण्याचे आवाहन करणारे निमंत्रण प्रत्येक मतदाराला पाठवण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा निवडणूक यंत्रणा राबवणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले मतदार हा निवडणुकीतील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा गेल्या २ महिन्यां पासून कार्यरत आहे. नवीन मतदार नोंदणी पासून ते आज घडीला मतदान केंद्रांची माहिती प्रत्येक म तदारापयर्ंत पोहचवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने नियोजनबध्द कार्यक्रम राबविला आहे आणि यापुढेही तो राबवला जाणार आहे. मतदार जागृती करत असताना प्रत्येक मतदार संघातील भौगोलिक परिस्थिती व या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर झालेले मतदान याची माहि ती समोर ठेवून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या मतदान केंद्रावर कमी म तदान नोंदवले गेले त्या केंद्राच्या परिसरात अधिक प्रभावीपणे मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणाबरोबरच स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, रेशन दुकानदार, महिला बचत गट यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. हे सर्व घटक मतदान जागृतीमध्ये प्रामाणिकपणे योगदान देत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपयर्ंत पोहोचणे शक्य होणार आहे.