मोकाट जनावरांमुळे अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:33+5:302021-09-10T04:49:33+5:30

मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश ...

Invitation to an accident due to stray animals | मोकाट जनावरांमुळे अपघातास आमंत्रण

मोकाट जनावरांमुळे अपघातास आमंत्रण

मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात जुने बसस्टँड ते अकोलाफाटा जुने बसस्टँड ते शेलूफाटा जोगदंड हॉस्पिटल ते गांधी चौक, गांधी चौक ते शिव चौक आठवडाबाजार ते तहसील रोड रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात.

आदी मार्गांवर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात. दुभाजकांवर उभे राहणे, दुभाजकांनाच रेटून बसणे, रस्त्यांच्या मधोमध उभे राहाणे, असे प्रकार जनावरे करीत असतात. शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यातच अतिक्रमणही वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे.

शहरात सर्वत्र मोकाट जनावरांना मुक्तसंचार आढळतो. रस्तोरस्ती जनावरे कधी कळपाने, तर कधी एकटीदुकटी फिरत असतात. अशा मोकाट जनावरांचा नगरपंचायतीने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: Invitation to an accident due to stray animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.