शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘त्या’ अवैध सावकारांच्या मालमत्तेची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:35 PM

वाशिम : सावकारांच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधितांच्या मालमत्तेची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरातील बंडू सौदागर तुपसांडे आणि रामभाऊ खंडजी सांगळे या दोन अवैध सावकारांच्या घर, प्रतिष्ठानांवर जिल्हा उपनिबंधकांच्या तीन पथकांनी ९ जानेवारीला धाडी टाकून अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त केले. दरम्यान, दोन्ही सावकारांच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधितांच्या मालमत्तेची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. जिल्ह्यात अवैध सावकारीसंदर्भात प्रशासनाला पिडितांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या निर्देशावरून अवैध सावकारांवर कारवाईच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या. त्यानुसार, ९ जानेवारी रोजी तीन पथकांनी वाशिम शहरातील रामभाऊ खंडजी सांगळे व बंडू सौदागर तुपसांडे यांच्या घर व प्रतिष्ठाणांवर धाडी टाकल्या. या धाडसत्रात १०५ अपेक्षा अधिक अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त करण्यात आले. त्यात कोरे धनादेश, खरेदी स्टॅम्प, अवैध सावकारीच्या नोंदी असलेल्या वह्यांचा समावेश आहे. त्याची अंदाजे किंमत १.५ कोटींवर असल्याचे सहकार विभागाच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले. दरम्यान, याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या दस्तावेजांच्या चौकशीसोबतच दुय्यम निबंधक कार्यालयाकडून संबंधित अवैध सावकारांच्या शेती, प्लॉट, घर यासह अन्य स्वरूपातील मालमत्तांची तपासणी केली जाणार असून त्याआधारे संबंधित सावकारांची सुनावणी घेवून पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिम