हत्या प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात

By Admin | Updated: December 28, 2015 02:46 IST2015-12-28T02:46:46+5:302015-12-28T02:46:46+5:30

वाशिम जिल्ह्यातील आसोला येथील हत्या प्रकरणाचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अप्राप्त.

Investigation of murder case in cold storage | हत्या प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात

हत्या प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात

वाशिम: फॉरेन्सिक लॅबमधून अद्याप अहवाल न आल्याने आसोला शेतशिवारात घडलेल्या हत्याकांडाचा तपास १५ दिवसानंतरही थंड बस्त्यातच आहे. वाशिम ते शेलूबाजार मार्गावर असलेल्या आसोला शेतशिवारात शेषराव बरडे यांच्या शेतामधील कडब्याच्या गंजीमध्ये १३ डिसेंबरला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा उलगडा करण्यासाठी वाशिम ग्रामीण पोलिसांनी जळून खाक झालेल्या अवस्थेत असलेला मृतदेह नेमका महिलेचा आहे की पुरुषाचा, याचा शोध घेण्यासाठी अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ज्ञाला बोलावले होते. औरंगाबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी मृतदेह पाठविला होता. अद्यापही तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने तपासाची दिशा अनिश्‍चित असल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटविण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. आसोला येथील शेषराव बरडे हे आपल्या शेतातील कडबा आणण्यासाठी १३ डिसेंबरला शेतामध्ये गेले असता त्यांना एकूण कडबा गंजीपैकी एक कडब्याची गंजी जळाल्याचे निदर्शनात आले. कडबा गंजीजवळ जाऊन बघितले असता एका व्यक्तीचा मृतदेह जळून खाक झाल्याचे आढळून आले होते.

Web Title: Investigation of murder case in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.